खाद्य संस्कृतीत 'वाचन संस्कृती' रुजू शकते हा विचार करून नाशिकच्या ७३ वर्षांच्या आजी भीमाबाई जोंधळे यांनी हॅाटेलमध्ये वाचनालय सुरू केलं आहे. नाशिकच्या ओझरजवळ आजीचं पुस्तकांचं हॅाटेल आहे. भीमाबाई जोंधळे यांनी चहाच्या टपरीपासून व्यवसायाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी कुटुंबाच्या सहकार्याने हे हॅाटेल उभारलं. मोबाईलच्या आहारी गेलेल्या आजच्या तरुण पिढीला वाचनाची गोडी लागावी यासाठी २०१५ पासून हॅाटेलमध्ये पुस्तकं ठेवण्याची कल्पना त्यांना सुचली. सुरुवातीला २५ ते ३० अशी पुस्तकं येथे ठेवण्यात आली होती. पुस्तकांचा हा आकडा वाढून आता ५ हजारांच्या घरात गेलाय. आजीच्या या हॅाटेलमध्ये आणखी काय विशेष आहे जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडीओ पाहा...